गणपती मूर्ती आणि स्थानिक कारागिर
गणपती मूर्ती आणि स्थानिक कारागिर
डॉ. अलोक पवार
यंदा मी अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे थेट गणेश चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाला घ्यायला गेलो. म्हणजे आधी बुकिंग केले गेले नाही. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा पाहिल्यावर गणपती बाप्पा पसंत पडले आणि त्यांचे आगमन घरी झाले. पण त्यांना जी शोधशोध करावी लागली त्यासाठी निदान पंधरा ते वीस दुकाने तरी यंदा पालथी घातली. मूर्ती पसंत करताना जरी बाप्पा असले तरी घेणारा व्यक्ती दोन गोष्टी पाहतोच. एक म्हणजे बाप्पा किती रेखीव आणि आकर्षित आहेत आणि दुसरी म्हणजे बाप्पाची विक्री किंमत. मला यंदाच्या किंमती या गगनाला भिडणाऱ्या वाटल्या. म्हणजे या किंमतीवर बोलणे थोडे अवघड वाटते सर्वांना. पण असे प्रश्न का तयार होतात या गोष्टी पडताळणे हे तितकेच महत्वाचे वाटले.
बऱ्याच वर्षांपासून जेंव्हा आपण सर्वच जण दुकानात गणपती बघायला जातो तेंव्हा आपल्याला एक खास गोष्ट दिसते ती म्हणजे दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लावलेला दिसतो तो म्हणजे 'पेणचे गणपती'... काही दुकानांच्या बाहेर 'आमच्याकडे शाडू मातीचे गणपती भेटतील' असेही फलक लावलेले दिसले.
प्रश्न असा आहे, हे गणपती कुठे बनतात? कसे बनतात? कशाचे बनतात? त्यांचे पुढे काय होते? या सर्वांचा विचार करणे हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अगदी महत्वाचे आहे. गणपती हे जास्त करून प्लास्टर ऑफ पॅरिस चे बनतात. त्याच बरोबर शाडूच्या मातीचे आणि आता नवीन पर्यावरणपूरक तांबड्या मातीचे देखील बनतात. गणपती सुबक दिसावेत म्हणून त्यांना रंग देखील उत्कृष्ट दिला जातो. गणपतीच्या रंगा रूपासाठी तो उत्कृष्ट असतो मात्र गणपती विसर्जन ज्या ठिकाणी केले जाते त्या पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने हे रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि अगदी नाही नाही म्हणलं तर शाडू माती देखील भयावह असते. असो हे सर्व पर्यावरण विषयक व्यक्ती ओरडून ओरडून सांगतील माझा विषय थोडा वाणिज्य आणि व्यवस्थापनाशी आहे.
प्रत्येक गावात आणि शहरात गणपतीच्या मुर्त्या बनविणारे स्थानिक कारागीर असतात. पेणचे म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेणचे गणपती कारागीर जसे प्रसिद्ध आहेत तसे अगदी पुण्यातही रविवार पेठेत, शनिवार वाड्याकडून जुन्या बाजाराकडे जाणाऱ्या परिसराच्या ठिकाणी देखील मातीच्या गोष्टी तयार करणारे कारागीर आहेत. हे कारागीर मातीची भांडी, मडके, दिवाळीमध्ये मुलांसाठी लागणारे किल्ले, किल्यावरच्या विविध मुर्त्या, पणत्या, गणपती, गौरीचे मुखवटे अशा बऱ्याच गोष्टी याठिकाणी बनवले जातात.
आता प्रश्न असा आहे की, एका ठराविक ठिकाणाची मक्तेदारी न राहता वस्तूंच्या विक्रीसाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध राहतात. मात्र अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रक्रियेमुळे स्थानिक कारागीरांनी बनविलेल्या मुर्त्यांना किंवा अन्य वस्तूंना पर्याय उपलब्ध होतात व त्यांच्या उपजीविकेवर देखील परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये महत्वाचे हे आहे की जे लोक ठिकठिकाणी गणपती किंवा इतर मातीच्या वस्तूंचे स्टॉल लावून त्याचे विपणन आणि विक्री करतात त्यांनी स्थानिक भागाव्यक्तीरिक्त इतर भागातून गणपती आणण्यापेक्षा आपल्याच भागातील कारागीरामार्फत बनविलेल्या
Comments
Post a Comment