Posts

गणपती मूर्ती आणि स्थानिक कारागिर

गणपती मूर्ती आणि स्थानिक कारागिर डॉ. अलोक पवार  यंदा मी अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे थेट गणेश चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाला घ्यायला गेलो. म्हणजे आधी बुकिंग केले गेले नाही. बऱ्याच ठिकाणी गणपती बाप्पा पाहिल्यावर गणपती बाप्पा पसंत पडले आणि त्यांचे आगमन घरी झाले. पण त्यांना जी शोधशोध करावी लागली त्यासाठी निदान पंधरा ते वीस दुकाने तरी यंदा पालथी घातली. मूर्ती पसंत करताना जरी बाप्पा असले तरी घेणारा व्यक्ती दोन गोष्टी पाहतोच. एक म्हणजे बाप्पा किती रेखीव आणि आकर्षित आहेत आणि दुसरी म्हणजे बाप्पाची विक्री किंमत. मला यंदाच्या किंमती या गगनाला भिडणाऱ्या वाटल्या. म्हणजे या किंमतीवर बोलणे थोडे अवघड वाटते सर्वांना. पण असे प्रश्न का तयार होतात या गोष्टी पडताळणे हे तितकेच महत्वाचे वाटले.  बऱ्याच वर्षांपासून जेंव्हा आपण सर्वच जण दुकानात गणपती बघायला जातो तेंव्हा आपल्याला एक खास गोष्ट दिसते ती म्हणजे दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लावलेला दिसतो तो म्हणजे 'पेणचे गणपती'... काही दुकानांच्या बाहेर 'आमच्याकडे शाडू मातीचे गणपती भेटतील' असेही फलक लावलेले दिसले.  प्रश्न असा आहे, हे गणपती कुठे बनतात?...